Rating 5.0 out of 5 (1 ratings in Udemy)
What you'll learn- आपल्या मनाचे आकर्षणाच्या सिद्धांतासाठी प्रोग्रामिंग कसे करावे
Descriptionमित्रानो,
आपल्याला जे हवे आहे ,पैसे,गाडी,बंगला,चांगली नाती,.... ते मिळवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत असतो.आपण ते प्राप्त करण्यासाठी काही वेळा आकर्षणाचा सिद्धांताचाही वापर करण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक प्रयत्न करूनही अपयश मिळते किंवा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि कारणही समजत नाही.
मित्रांनो, या अपयशाचे एक कारण आपले आंतरिक विश्वास असतात.काही वेळा आपले …
Rating 5.0 out of 5 (1 ratings in Udemy)
What you'll learn- आपल्या मनाचे आकर्षणाच्या सिद्धांतासाठी प्रोग्रामिंग कसे करावे
Descriptionमित्रानो,
आपल्याला जे हवे आहे ,पैसे,गाडी,बंगला,चांगली नाती,.... ते मिळवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत असतो.आपण ते प्राप्त करण्यासाठी काही वेळा आकर्षणाचा सिद्धांताचाही वापर करण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक प्रयत्न करूनही अपयश मिळते किंवा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि कारणही समजत नाही.
मित्रांनो, या अपयशाचे एक कारण आपले आंतरिक विश्वास असतात.काही वेळा आपले आंतरिक विश्वास हे आपल्याला जे हवे आहे त्याविरुद्ध असतात आणि बहुतांश वेळा हे अंतर्मनामध्ये लपलेले असतात. आपले जर आपल्याला श्रीमंत व्हायचे असेल,पैसे हवे असतील तर आपला आंतरिक विश्वास "मी श्रीमंत होऊ शकत नाही","मी गरीब आहे","पैसे मिळणे नशिबाचा भाग आहे","पैश्यामुळे शत्रू वाढतात ",...... असे असूच शकत नाही.या कोर्से मध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या भागामध्ये लपलेले असे आंतरिक विश्वास आपण शोधणार आहे.आपल्याला जे हवे आहे त्याच्या विरुद्ध जर आपले आंतरिक विश्वास असतील तर आकर्षणाचा सिद्धांत आपल्या जीवनामध्ये कार्य करत नाही.आकर्षणाचा सिद्धांत कार्य न करण्यामागे अंतर्मनाचे योग्य प्रोग्रामिंग न होणे किंवा आपले वायब्रेशन्स न वाढणे हे सुद्धा कारण असते.या कोर्सेमध्ये याच सर्व गोष्टी शिकायला मिळणार आहेत .तसेच आकर्षणाच्या सिद्धान्तामध्ये बाधा होणारे आंतरिक विश्वास कसे शोधावे ,आपल्याला नको असणारे आंतरिक विश्वास कसे आतून काढून टाकावे आणि हवे असणारे आंतरिक विश्वास कसे निर्माण करावे ,हेही समजणार आहे.आपले नकारात्मक आंतरिक विश्वास हे बहुतांश वेळा भूतकाळातील काही नकारात्मक घटनांमधून तयार झालेले असतात.या घटना आपल्या मनामध्ये आठवणींच्या रूपामध्ये साठवल्या जातात. या नकारात्मक आठवणी अनेक वेळा आपल्या आतमध्ये दुःखाच्या भावना तयार करतात तसेच नकारात्मक आंतरिक विश्वास तयार करतात.ज्यामुळे अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये या गोष्टी आकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध काम करतात आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त होत नाही.त्यामुळे वेळोवेळी निर्माण झालेले नकारात्मक आंतरिक विश्वास मनातून काढून टाकणे आणि सकारात्मक वायब्रेशन्स वाढवणे महत्वाचे आहे.या कोर्से मध्ये नकारात्मक आंतरिक विश्वास निर्माण करणाऱ्या दुःखद किंवा नकारात्मक घटना कश्या मनातून काढून टाकाव्यात,हे आपल्याला समजणार आहे.आकर्षणाचा सिद्धांताला दिशा देणारे काही मॅजिकल affirmations सुद्धा आपल्याला मिळणार आहेत .तसेच जे हवे ते आकर्षित करण्यासाठी ,आपले व्हायब्रेशन्स वाढवण्यासाठी दोन असरदार Visualizations या कोर्से मध्ये आहेत ,ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचे प्रोग्रामिंग करणे सोपे होणार आहे. एकूणच या कोर्से मधील ज्ञानाचा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये उपयोग केला तर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता.
धन्यवाद.